🏡 शेअर मार्केटचा माणूस शेळ्या चारतोय – एक दिवस गावात!
आज सकाळी उठून, मिरचीचं रोप आणायला निघालो होतो. .. फाट्यावर पोचलो, तेवढ्यात पाऊस सुरू झाला. थोडा थांबून मग 3 किलोमीटर दूर ‘श्री सिद्ध भैरवनाथ हाईटेक नर्सरी’ त गेलो. Bus stop पासून थोडं चालत आत गेलो, आणि तिथं एकापेक्षा एक झाडं होती! शेवटी एक मस्त मिरचीचं रोप घेतलं, आणि शेतावर आलो. 🌱 मातीशी नातं – वाफा तयार करून लावलेलं मिरचीचं रोप वाफा तयार केला… आणि ते रोप प्रेमाने लावलं. नवीन झाड लावताना जे समाधान मिळतं, ते खरंच काही वेगळंच असतं… 🐐 खंडू आणि निवांत शेळ्यांचं गावातलं आयुष्य मग गेलो आमच्या शेळ्यांकडे – खंडू , आमचा कुत्रा पण सोबत होता. डोंगर, हिरवळ, आणि शेळ्यांची निवांत चारा-यात्रा. पाऊस परत सुरू झाला… शेळ्या झाडाखाली विसावल्या, आणि मीही थोडा थांबलो. 🌧️ निसर्ग, पाऊस आणि शांतता थोड्याच वेळात पाऊस उघडला. मी डोंगराच्या कडेला गेलो… आणि तिथं एक सुंदर धबधबा वाहताना दिसला. खाली दिसणारं शेत, डोंगरदर्या – एकदम स्वर्गसदृश दृश्य! ❤️ शेवटचं विचार शेअर मार्केटचं tension विसरून, मातीशी नातं जपलेला एक दिवस… कुठल्याही profit पेक्षा कमी नव्हता हा अनुभव !